Marathi Lekh

आचार्य अत्रे: ‘विनोदाचा’ जन्म

आपल्या मराठी मजकूराची व्याकरण आणि विरामचिन्हांची तपासणी करून त्यामध्ये आवश्यक ते सुधारणा केल्या आहेत:

स. का. पाटील हे संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक तर अत्रे हे खंडे समर्थक होते, इतके की संयुक्त महाराष्ट्र शक्य झाला तो त्यांच्यामुळेच असे मानले जाते. तर हा त्यांचा किस्सा. स. का. पाटील यांच्यावर टीका करण्याची एकही संधी अत्रे यांनी सोडली नाही. मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही असे ते वारंवार ठामपणे म्हणत असल्याने अत्र्यांचा त्यांच्यावर राग होता. एका सभेत बोलताना, “दोन चांगल्या गोष्टीत एक वाईट गोष्ट घडते,” असे सांगून ते म्हणाले, ‘१३ ऑगस्ट ला माझा जन्म झाला, १५ ऑगस्ट ला भारताला स्वातंत्र्य मिळाले या दोन चांगल्या गोष्टी झाल्या, पण १४ ऑगस्ट ला स. का. पाटील जन्माला आले.’ असे विनोदाचे हत्यार म्हणून वापरणारे, अन्याय, चुकीच्या गोष्टींवर सडकून टीका करणारे, लेखक, फर्डे वक्ते, विनोदाचे प्रमाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते, नेते, साहित्यासह राजकारणात ठसा उमटवणारया दुर्मिळ व्यक्तींपैकी आचार्य अत्रेंचा सार्थ अर्थाने ‘विनोदाचा’ जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला सासवड येथे झाला.

एक क्षेत्र असं आचार्य अत्र्यांच्या बाबतीत सांगता येत नाही, जेथे त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी अत्युत्तम केले. ‘रायटर आणि फायटर ऑफ महाराष्ट्र’ असे भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आचार्य अत्रे यांचे वर्णन केले आहे. पुणे आणि लंडन येथे त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. भारतात परतण्यापूर्वी हॅरो येथे त्यांनी अध्यापन केले, आणि पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ते अध्यापन करत असताना नंतर तेथेच मुख्याध्यापक झाले आणि आचार्य हे बिरुद प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नावामागे लागले, जे कायमचे राहिले पण या व्यतिरिक्तही शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची कारकीर्द बरीच मोठी आहे.

नवयुग मधील लेख, शालेय अभ्यासक्रमातील ‘झेंडूची फुले’ मधील कविता आणि ‘दिनुचं बिल’ सारख्या कथा ह्या पाठ्यपुस्तकाचा भाग बनल्या. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी एकूण २२ नाटके लिहिली, ‘साष्टांग नमस्कार’, ‘मोरूची मावशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘भ्रमाचा भोपळा’, ही त्यांची निखळ आनंद देणारी नाटके. तर ‘तो मी नव्हेच’ हे उत्कंठा वाढवणारे नाटक. विनोद प्रधान नाटकांची नवी परंपरा त्यांनी घातली. मराठी विनोदाचा पाया रचणाऱ्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी यांचे शिष्य म्हणजेच आचार्य अत्रे. पुलं आणि अत्रे ही महाराष्ट्राच्या चतुरस्त्र व्यक्तित्वाची नावे, एक निखळ विनोद तर दुसऱ्याच्या हातात विनोदाचं अस्त्र होतं. महाराष्ट्राची विनोदाची ही वैभवशाली परंपरा. वक्तृत्व ही कला आहे आणि ‘वक्ता दशसहस्रेषु’ ही उक्ती त्यांच्याबाबत सार्थ ठरते. त्यांच्या निधनानंतर ५० वर्षे उलटूनही वक्तृत्वावरील त्यांचं निर्विवाद श्रेष्ठत्व वक्ते आणि श्रोते मान्य करतात. त्यांच्या भाषणाप्रसंगीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत ज्याला समय सूचकता आणि हजरजबाबीपणा यांनी त्यांच्या साहित्याला इतकीच प्रसिद्धी मिळाली. त्या काळातील ना. सी. फडके, बाळासाहेब ठाकरे, श्री. म. माटे यांच्यासोबतचे वैचारिक वादही चर्चेचा विषय होते. परंतु जितके ते लिहिताना बारीक बारीक गोष्टीचा आढावा घेतात तितकंच सहज ते कौतुकही करत, त्यांचा सत्कार ना. सी. फडकेंनी केला त्या प्रसंगीचे त्या दोघांचे भाषण हे त्याचे द्योतक होते.

साहित्य आणि विनोद यांच्यापासून जसे अत्रे हे नाव वेगळे करणे अशक्यच तसंच त्यांच्या समाजकारणाचेही. राजकारणातही ते चमकले, महाराष्ट्र विधानसभेचे आमदार, पुणे शहरातील नगरसेवकपद ही कारकीर्द देखील गाजली. ‘भांबुर्डा’ या गावाचं ‘शिवाजी नगर’, आणि ‘रे मार्केट’ चे ‘महात्मा फुले’ असं नामकरण करण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यावेळी ते विरोधी पक्षात असूनही त्यांचं राजकारणावर, समाजावरच वर्चस्व निर्विवाद होतं. आजची ‘नावाला विरोधक’ अशी राज्यांची किंवा केंद्रातील स्थिती पाहता ही गोष्ट उल्लेखनीय आहे हे मान्य करावे लागते. विरोधी पक्षात असूनही हिताच्या किंवा साधक कार्याला फक्त विरोधक म्हणून ते आड आले नाही तर ज्या कारणास्तव विरोधी पक्ष हा राज्यघटनेत महत्वाचा ठरतो ते अंकुश ठेवण्याचे, लोकांसमोर आणण्याचे, धाडसाने जाब विचारण्याचे खरे कार्य त्यांनी केले.

त्यांनी एक किस्सा सांगितला होता.. की ‘लोक म्हणतात अत्रे तुमचे सर्व मान्य आहे, चांगले आहे ते विनोद तेवढे वर टोचतात हो.. ते थोडे दूर करा…’ यावर ते म्हणाले होते ‘विनोद गेला तर उरते ते काय?’ ‘एकदा पर्वती चढताना ते दमले त्यावेळी त्यांना टोचण्याची खोड अंगात आलेला एक व्यक्ती म्हणाला मी चार वेळा चढून आलो. तुम्ही पहिल्यातच दमलात, अजून दोनदा चढलो तर काय द्याल ? त्यावर अत्रे सहज म्हणून गेले “खांदा”. असा ज्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक विनोद होता.. तो महान साहित्यिक, नेता, पत्रकार, आणि बरच काही असलेले आचार्य अत्रे वयाच्या ७०व्या वर्षी १३ तारखेलाच जून १९६९ ला मागे पुढील अनेक पिढ्यांना पुरेल इतकं प्रचंड देवून अनंताच्या यात्रेला निघून गेले. ‘कर्हेचे पाणी’ हे पाच खंडातील आत्मचरित्र म्हणजे आपल्या पिढीसाठी मागे राहिलेले अत्रे आहेत. ज्यांना आपण पाहिले नाही, प्रत्यक्ष ऐकले नाही पण अनुभवू शकतो.

चित्रपट क्षेत्रातही अत्रे यांची प्रदीर्घ कारकीर्द होती ‘ब्रान्डीची बाटली’, ‘पायाची दासी’, ‘धर्मवीर’, ‘ब्रह्मचारी’ हे काही उल्लेखनीय चित्रपट. अत्रे पिक्चर्सच्या निर्मितीनंतर साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले आणि या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर- राष्ट्रपतींचे सुवर्णपदक लाभले. विनोद आणि सामाजिक आशय यांची सांगड मात्र अत्रेंचा दुर्मिळ गुण. आज विनोदाच्या नावावरील थिल्लरपणा आणि सामाजिक आशय म्हटले की फक्त गंभीर आणि रडके चेहरे असे जे पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवर अत्रे यांचे साहित्य आणि कार्य खूप मोलाचे ठरते.

पत्रकारिता ही देखील आचार्य अत्रे यांची ओळख. ‘नवयुग’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. कालांतराने त्यांनी ‘दै. मराठा’ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांचे अग्रलेख हा त्याचा गाभा होता. त्याला विविध विषयांवर परखडपणे, मार्मिकपणे कधी चिमटा काढणारी उपहासाची जी किनार होती. त्यामुळे अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. प्रवास वर्णने, भाषणे, चरित्र, आत्मचरित्र अशा सोबतच ‘विडंबन’ हा काव्य प्रकार त्यांनी ‘केशवसुत’ ह्या टोपण नावाने मराठीत रुजवला आणि प्रतिष्ठित केला. त्यांच्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांबद्दल जितकं ते ओळखले जातात तितकंच हलकं, आणि मऊ त्यांचं चरित्रपर लेखन किंवा मृत्यूबद्दलचे लेख होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले श्रद्धांजलीपर लेख आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यू प्रसंगी झालेल्या एकमेव भाषणात हे प्रकर्षाने जाणवते.