लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आणि विश्लेषण

२०२४ च्या भारतीय लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक मुद्दे गाजले. पीएम मोदींची लोकप्रियता उच्चशिखरावर असूनही PLFS आणि CMIE च्या अहवालानुसार, वाढत्या बेरोजगारीच्या दरांमुळे सध्याच्या सरकारवर मतदारांचा रोष वाढला आहे. रोजगार निर्मिती, ग्रामीण आणि शहरी बेरोजगारी, परीक्षा, महागाई, अनेक आंदोलने आणि हिंसाचार यामुळे मतदारांत असंतोष वाढला. लोकप्रियतेनंतरही उत्तरप्रदेशात विस्मयजनक निकाल का आला? महाराष्ट्रात राजकीय गणित नक्की कुठे बदललं ? आणि कोणते मुद्दे अप्रत्यक्षरीत्या मतदानावर परिणाम करणारे ठरले जाणून घेऊया.

३०० शब्दांचा निबंध :जीव गमावलेल्या भारताच्या भविष्याला, कायदा-सुव्यवस्थेला दिलेली श्रद्धांजली

“३00 शब्दांचा निबंध आणि १५ दिवस ट्राफिक पोलिसांसोबत काम” अशी जामिनाची अट पुणे बाल न्याय मंडळाने एका बेजबाबदार बिल्डरपुत्रासाठी घातली. जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली आणि कायदा-सुव्यवस्थेला धक्का देणाऱ्या या प्रकरणातून “भारतात खरंच कायद्यापुढे समानता आहे का?” हा प्रश्न उपस्थित होतो.

आचार्य धर्मानंद कोसंबी

धर्मानंद कोसंबी यांचे कार्य बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आणि मराठी साहित्यात अमूल्य योगदान देणारे आहे. त्यांनी विविध भाषांचा अभ्यास करून अनेक देशांत काम केले. त्यांचे लेखन सरळ आणि सोप्या मराठीत आहे, विशेषतः जातककथा संग्रह. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

महानुभाव श्री चक्रधर: मराठी भाषेतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक

मराठी भाषेतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक आणि पहिले ज्ञात समाजसुधारक . आजही ज्या स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण झगडतोय, जात-शूद्र-अतिशूद्र या संकल्पनांतून बाहेर येण्याऐवजी त्या गर्तेत खोल रुतत चाललो आहे, त्याचं उच्चाटन करण्याचा सफल प्रयत्न ह्या युगपुरुषाने केला. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री – शूद्र यांना देखील मोक्षाचा अधिकार आहे असं मानून ती तत्व ‘महानुभाव’ या पंथाच्या आणि त्या द्वारे समाजाच्या आचरणात त्यांनी रुजवली.

‘या सम हाच’: पु.ल. देशपांडे

“दुनियेच्या बाजारपेठेत ते मनमुराद वावरले, पण काळजातील बुद्ध कधी काजळला नाही,” असं सार्थ वर्णन कवी कुसुमाग्रजांनी ज्यांच्याबद्दल केलं, ते जिवंत आख्यायिका आणि भारतातील दूरदर्शनचे पहिले प्रोड्युसर, सर्व माध्यमांतून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके पु.ल. लेखन, नाट्य, अभिनय, दूरचित्रवाहिनी, स्वतंत्र महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान, अभिनव प्रयोग करणारे कलावंत, समाजकार्य करणारे, असे अनेक पैलू ज्यांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतात त्यांच्याबद्दल.

कबीर: मानवतेचा पुरस्कार करणारा महान संत

“पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।” खूप मोठे मोठे ग्रंथ वाचून लोक मृत्यू पावले, पण सर्वजण विद्वान झाले नाहीत. पण, ज्याने कोणी प्रेम किंवा ‘प्यार’ हे अडीच अक्षर समजून घेतले, म्हणजेच प्रेमाचे खरे रूप समजून घेतले, तोच खरा विद्वान आहे. हे म्हणणारे कबीर हे […]

नॉस्ट्रॅडेमस- फ्रेंच भविष्यवेत्ता

‘भविष्य’ गूढ, अनाकलनीय आणि तितकेच आकर्षित करणारा विषय आहे. भविष्याचा वेध घेणं ही माणसाची कायमची इच्छा राहिली आहे, त्यामुळे त्याविषयी एकापेक्षा एक सुरस कथा, दंतकथा जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक जण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात, पण नॉस्ट्रॅडेमस सारखी प्रसिद्धी, गूढतेचं वलय आणि आकर्षण शतकांनंतरही राहिले हे क्वचितच आहे. मिशेल नॉस्ट्रॅडेमस या फ्रेंच भविष्यवेत्त्याचा जन्म २३ […]

व्हिन्सेंट व्हॅन गॉग – एक कलाकार ज्याने ‘सौंदर्या’ची व्याख्या बदलली

फक्त १० वर्षांतील त्याची कारकीर्द, ९०० हून अधिक पेंटिंग्ज, आयुष्यभर जगावर खरखुरं प्रेम करणारा, प्रत्येक गोष्टीत जगाच्या भल्याचा विचार करणारा, ज्याची छोट्यातून छोटी कृतीही कोणत्याही उदात्त विचाराने भरलेली असते, अशा एका महान चित्रकाराबद्दल आणि प्रत्येक पायरीवर त्याला प्रोत्साहन देणाऱ्या थिओ बद्दल.

आचार्य अत्रे: ‘विनोदाचा’ जन्म

आपल्या मराठी मजकूराची व्याकरण आणि विरामचिन्हांची तपासणी करून त्यामध्ये आवश्यक ते सुधारणा केल्या आहेत: स. का. पाटील हे संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक तर अत्रे हे खंडे समर्थक होते, इतके की संयुक्त महाराष्ट्र शक्य झाला तो त्यांच्यामुळेच असे मानले जाते. तर हा त्यांचा किस्सा. स. का. पाटील यांच्यावर टीका करण्याची एकही संधी अत्रे यांनी सोडली नाही. मुंबई […]