महानुभाव श्री चक्रधर: मराठी भाषेतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक

मराठी भाषेतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक आणि पहिले ज्ञात समाजसुधारक . आजही ज्या स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण झगडतोय, जात-शूद्र-अतिशूद्र या संकल्पनांतून बाहेर येण्याऐवजी त्या गर्तेत खोल रुतत चाललो आहे, त्याचं उच्चाटन करण्याचा सफल प्रयत्न ह्या युगपुरुषाने केला. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री – शूद्र यांना देखील मोक्षाचा अधिकार आहे असं मानून ती तत्व ‘महानुभाव’ या पंथाच्या आणि त्या द्वारे समाजाच्या आचरणात त्यांनी रुजवली.