आचार्य धर्मानंद कोसंबी

धर्मानंद कोसंबी यांचे कार्य बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आणि मराठी साहित्यात अमूल्य योगदान देणारे आहे. त्यांनी विविध भाषांचा अभ्यास करून अनेक देशांत काम केले. त्यांचे लेखन सरळ आणि सोप्या मराठीत आहे, विशेषतः जातककथा संग्रह. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
महानुभाव श्री चक्रधर: मराठी भाषेतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक

मराठी भाषेतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक आणि पहिले ज्ञात समाजसुधारक . आजही ज्या स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण झगडतोय, जात-शूद्र-अतिशूद्र या संकल्पनांतून बाहेर येण्याऐवजी त्या गर्तेत खोल रुतत चाललो आहे, त्याचं उच्चाटन करण्याचा सफल प्रयत्न ह्या युगपुरुषाने केला. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री – शूद्र यांना देखील मोक्षाचा अधिकार आहे असं मानून ती तत्व ‘महानुभाव’ या पंथाच्या आणि त्या द्वारे समाजाच्या आचरणात त्यांनी रुजवली.
संत नामदेव

सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्त बोलों नये ।। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका|| तुकाराम महाराजांसारख्या संतश्रेष्ठांनी व्यक्त केल्याप्रमाणे शतकोटी अभंग लेखनाची कल्पना सुचणारे संत नामदेव म्हणजे मराठीचे अनमोल रत्न. भारताच्या साहित्य आणि समाजजीवनामध्ये नवचैतन्य, आधुनिकता, सात्विकता आणि परखडपणे समाजजीवनावर भाष्य करण्याचे काम संतांनी वेगवेगळ्या कालखंडात केले. महाराष्ट्राच्या […]