‘या सम हाच’: पु.ल. देशपांडे

“दुनियेच्या बाजारपेठेत ते मनमुराद वावरले, पण काळजातील बुद्ध कधी काजळला नाही,” असं सार्थ वर्णन कवी कुसुमाग्रजांनी ज्यांच्याबद्दल केलं, ते जिवंत आख्यायिका आणि भारतातील दूरदर्शनचे पहिले प्रोड्युसर, सर्व माध्यमांतून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके पु.ल. लेखन, नाट्य, अभिनय, दूरचित्रवाहिनी, स्वतंत्र महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान, अभिनव प्रयोग करणारे कलावंत, समाजकार्य करणारे, असे अनेक पैलू ज्यांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतात त्यांच्याबद्दल.